पाटोदा: माझ्या घोषणांनी तुम्ही पवित्र होणार नाहीत,तुम्ही कशासाठी आले हे मला कळलं मंत्रीपंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना खडसावले
Patoda, Beed | Oct 2, 2025 सावरगाव घाट (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आयोजित भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी काही कार्यकर्त्यांना थेट फटकारले. भाषणादरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे रोखून पाहत त्यांनी तीव्र शब्दांत सुनावले. “मेळाव्यात घोषणा देणाऱ्या पोरांना मी वाटोळं केलं आहे. पोरांनो, कोणाची सुपारी घेऊन आलात हे मला माहित नाही, पण तुम्हाला शरम नाही का? माझ्या घोषणा दिल्याने तुम्ही पवित्र होणार नाही. नेमके कशासाठी आलात हे मला आता समजलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना