पालघर: जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह, जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचची शक्यता वर्तवण्यात आली आहे.