जालना: नगरसेवक महावीर ढक्का यांच्या पाठपुराव्याला यश; आयुक्त अंजली शर्मा यांचा प्रभाग क्रमांक ९ मध्ये दौरा*
Jalna, Jalna | Jul 7, 2026 जालना शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील विविध नागरी समस्यांबाबत नगरसेवक महावीर ढक्का यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वतः प्रभागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत काळुका माता परिसर, डबल जीन, तुळजाभवानी नगर, दर्गा वेस, सोनल नगर, नीलम नगर, सुभद्रा नगर, गांधी चमन तसेच महानगरपालिका ते न