अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात बत्तीस हजार शेतकऱ्याचे अतिवृष्टी नुकसान आणि मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या मागणीला घेऊन सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी आमरण उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान 27 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम अजून पर्यंत मिळाली नाही तर 5000 शेतकऱ्यांच्याच खात्यात ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे बाकीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी ही मागणी केली जात आहे