दर्यापूर: कसबेगव्हाण सरपंच शशिकांत मंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट;रस्ते विकासकामांसाठी निधीची मागणी
कसबेगव्हाण येथील सरपंच शशिकांत मंगळे यांनी आज दुपारी ४ वाजता नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या परिसरातील प्रस्तावित रस्ते विकासकामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. या वेळी सरपंच मंगळे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाचे मुख्य माध्यम असून या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्ते विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला नव संजीवनी देण्याचा आमचा निर्धार आहे.