जालना: दोन वर्षांपासून निवृत्तीवेतन आणि लाभ रखडले; सेवानिवृत्त कर्मचार्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु
Jalna, Jalna | May 14, 2026 जिल्हा परिषद आरोग्य विभागातून सप्टेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचार्याला आजतागायत पेन्शन व सेवा निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळाले नसल्याने त्यांनी आता जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे निवेदन दिले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिरडगाव,ता.घनसावंगी येथून निवृत्त झाले.