30 डिसेंबरला सायंकाळी 6:00 वाजता च्या सुमारास मिळाल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान घरी प्रतिबंधित नायलॉन म्हणजे साठवून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील आरोपीचे नाव आदर्श जयस्वाल असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून नायलॉन मांजा मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 61 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास आठवडा पोलीस करीत आहे.