दिवा परिसरातील ओमकार नगर येथून एक खळबळ जनक घटना समोर आली. नाल्यामधून रडण्याचा आवाज आल्यावर डोकावून पाहिले असता एक अर्भक आढळून आले. त्यानंतर उपस्थित असलेल्यांपैकी एकाने नाल्यात उतरून अर्भक बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र चार ते पाच दिवसाचे अर्भक नाल्यात फेकून दिल्याने त्याला दुखापत झाल्याचे निदर्शनास आले मात्र त्याच्या आईबाप कोण नाल्यात का फेकले याबाबत अद्याप पर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नसून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली