मोहाडी: सीतासावंगी येथे विनापरवाना देशी विदेशी कंपनीची दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा सीतासावंगी येथे दि. 23 सप्टेंबर रोज मंगळवार सायं.6 वा.च्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी देशी विदेशी कंपनीची दारू विक्री करणारा आरोपी दिनेश जगन्नाथ मेश्राम याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील देशी दारूचे 35 नग,OC BIUE व ROYAL STAG कंपनीचे 6 नग असा एकूण 1 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.