श्री विठ्ठल रूखमणी देवस्थान चांदणी चौक भंडारा येथे आषाढी देवशयनी एकादशी सोहळा भंडारा वारकरी मंडळाच्या वतीने दि. ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६.३० वाजता श्री विठ्ठल रुख्मिणी यांची अभिषेक व पूजन कार्यक्रम पार पडले. सकाळी ९ दरम्यान मंगल कलश यात्रा व पालखी दिंडी सोहळा प्रस्थान, मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. सदर दिंडी सकाळी ९- दु. १२ वाजता दरम्यान भंडारा शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करण्यात आली.