पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार या योजनेत शास्ती माफीसाठी पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. आता दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत शास्तीवरती 75 टक्के सुट राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले आहे. करदात्यांनी ईबिल स्वीकारणे, डिजिटल पद्धतीने कर भरणे यामुळे थेट २% सवलत मिळू शकते. तसेच ऊर्जा बचत करणारे सौर पॅनल, शेड नेट, वॉटर हार्वेस्टिंग अशा उपाययोजना केल्यास करामध्ये २% सवलत दिली जाणार आहे. याशिवाय, शेतजमिनीचे शेतकरी, अपंग व्यक्ती व माजी सैनिक यांना नियमानुसार करात सवलती मिळतील.