भंडारा येथील ऐतिहासिक व पवित्र बहिरंगेश्वर मंदिर परिसरात आयोजित 'श्रीकृष्ण चरित्र प्रवचनमाले'च्या मंगल प्रसंगी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान सपत्नीक उपस्थित राहून श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य मिळवले. परमपूज्य श्री हरिभाऊ निटुरकर महाराज यांच्या रसाळ आणि अमृतमय वाणीतून प्रवाहीत झालेल्या या प्रवचनमालेत श्रीकृष्णाच्या दिव्य लीला, निर्मळ भक्तीचा मार्ग, उत्तम संस्कार आणि मानवी जीवनमूल्यांचे सखोल....