तेल्हारा: तेल्हारा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. मनोज राठी व सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड झाली
Telhara, Akola | Sep 15, 2025 तेल्हारा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. मनोज राठी व सचिवपदी ॲड. संदीप वानखडे यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. मनोज राठी यांनी ३१ मते मिळवत विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. रामेश्वर मनतकार यांना २६ मते मिळाली. सचिवपदाच्या निवडणुकीत ॲड. संदीप वानखडे यांनी एका मताने आघाडी घेत निसटता विजय मिळवला. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ ॲड. श्रीकृष्ण रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले.