पारोळा: धोबी परिट समाजाला पूर्ववत अनुसुचित जातीत समाविष्ट करण्याबाबत मुख्यमंत्री व तहसीलदारांना निवेदन
Parola, Jalgaon | Oct 12, 2025 पारोळा -----धोबी समाज १९६० पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनु. जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. परंतु १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही जिल्हे ओबीसी मध्ये टाकण्यात आले त्यामुळे हे दोन जिल्हे पूर्ववत अनु. जाती मध्ये समाविष्ट करून अनु. जाती जमाती कायदा क्र.१०८ / १९७६ नुसार अंमलबजावणी करून आमच्या समाजाला न्यायद्यावा.