१० नोव्हेंबरपासून नगरपालिका नामांकन भरण्यास सुरुवात ; निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे अहमदपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून तहसील कार्यालय अहमदपूर येथे नामनिर्देशनपत्र (नामांकन अर्ज) वाटप व भरणा प्रक्रियेस सुरुवात होत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी केली आहे. त्यांनी उपविभाग कार्यालय येथे पत्रकार बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला