महाड: मनसे महाड शहर अध्यक्ष मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल
Mahad, Raigad | Nov 2, 2025 मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना शनिवारी झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी अखेर 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन ढेंडवाल राहणार महाड, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे,सौजन्य काणेकर, भावड्या सुर्वे, निरज खेडेकर सर्व राहणार गवळआळी,महाड यांच्यासह सपना मालुसरे राहणार,महाड आणि सुनंदा पवार राहणार दादली महाड या दोन महिलांचा यामध्ये समावेश आहे.