भद्रावती: अय्यप्पा मंदिर सभागृहात आ.सुधीर मुनगंटीवार यांचे तर्फे ३० भजनमंडळांना भजन साहित्याचे वाटप.
माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वतीने चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ३० भजन मंडळांना भजन साहित्याचे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात पार पडला.विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी भजन मंडळांना भजन साहित्य वाटपाचे आश्वासन दिले होते ते त्यांनी पुर्ण केले.यावेळी मुनगंटीवार यांनी केशवा माधवा हे भजन गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली.