लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटनेची नोंद झाली असून, कर्नाटकातील एका उच्चशिक्षित युवकाने रेल्वेखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे. कुमार इराप्पा सोलापूरे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव असून तो पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ठाण्यातून रविवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर युवक हा मूळचा कर्नाटक राज्याचा रहिवासी होता आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास होता.