आज रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रायगडमधील मुरूड येथे डॉ. सनाउल्लाह घरटकर फाउंडेशन संचालित संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या दशकपूर्ती कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी तटकरे यांचा ‘मुरूड रत्न’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सर्वांचे आभार व्यक्त करत, उपस्थितांना संबोधित केले. तसेच याप्रसंगी डॉ. सनाउल्लाह घरटकर संकल्पित ‘सामाजिक सुधारणा आणि आपले उत्तरदायित्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.