सातारा: सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई
Satara, Satara | Oct 16, 2025 सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार असून पिडीत कुटुंबला सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री श्री. देसाई यांनी सासपडे येथे जावून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नितीन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल उपस्थित होते.