अमरावती विभागातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या आदेशाविरोधात आज दि 15 ऑक्टोबर 1 वाजता शिक्षण बचाव समन्वय समिती तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.या संदर्भात समितीच्या अध्यक्ष व सचिव मंडळ यांच्या मार्फत अप्पर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या कडे आज निवेदन सादर करण्यात आले.सदर निवेदनाद्वारे समितीने राज्य शासनाकडे आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी शिक्षण बचाव समन्वय समितीने केली आहे.