शेवती येथील आश्रमशाळेत MR लसीकरण मोहीम यशस्वी
1.4k views | Mangrulpir, Washim | Sep 16, 2025 वाशिम (दि.१६ सप्टेंबर, २०२५): मंगरूळपीर तालुक्यातील प्रा. आ. केंद्र धामणी अंतर्गत शेवती येथील श्री. हरीभाऊ नाईक आश्रमशाळेत आज MR लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १६८ विद्यार्थ्यांना MR लस देण्यात आली. मोहिमेदरम्यान शाळेचे मा. मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी सक्रिय सहकार्य केले. तसेच प्रा. आ. केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम यशस्वी केली.