केज: मनोज जरांगे हत्या कट रचल्या प्रकरणात एसआयटी स्थापन करा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या चर्चेनंतर या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे, अशी ठाम मागणी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी खासदार सोनवणे म्हणाले की, "या गंभीर प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याच्या माध्यमातून तातडीने करावी. तसेच SIT (विशेष तपास पथक) नेमून सत्य परिस्थिती समोर आणावी." त्यांनी पुढे सांगितले की, "मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर झालेला कट हा लोकशाहीवरचाच आघात आहे. ज्यांनी हा कट रचला आहे