साक्री: पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणात जलसाठा वाढल्याने पांझरा नदीत पाणी वाढले; लहान फरशी पूल वाहतुकीसाठी बंद
Sakri, Dhule | Sep 28, 2025 हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर पिंपळनेरच्या लाटीपाडा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे.परिणामी पांझरा नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढल्याने कुस्ती मैदाना जवळील फरशी पुलावरून प्रचंड पाणी वाहत आहे.त्यामुळे सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर मोठ्या पुलाजवळील नदीपात्रातही प्रचंड पाण्याचा प्रवाह वाढत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारा तासांपेक्षा अधिक वेळेपासून प्रचंड पाऊस सुरू असल्याने पांझरा नदी पात्र ओस