लोकसभेत मंजूर झालेल्या VB-G RAM G अर्थात विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेशस्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीवर देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, खा. डॉ. अनिल बोंडे यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.