नागपूर ग्रामीण: ड्रिल मशीन ने काम करताना इलेक्ट्रिक करंट लागल्याने 20वर्षीय तरुणाचा मृत्यू
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार मजली निर्माणाधीन इमारतीत काम करताना एका २० वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० मे रोजी दुपारी ३:१५ च्या सुमारास मानेवाडा रोडवरील लाडीकर ले-आऊट येथे जांगीड यांच्या चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते.