केज: साठवण तलाव मंजुरीसाठी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कोरडेवाडी ग्रामस्थांनी केज तहसील समोर बैलगाडी पेटवून निषेध केला
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. साठवण तलाव मंजूर करण्यासाठी बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी बैलगाडी पेटवल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा दिवसापासून उपोषण सुरु आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.