मुंबई: भाजपा सहकार आघाडीची मुंबई बँकेच्या कार्यालयात आमदार प्रविण दरेकर यांनी घेतली ऑनलाईन बैठक
Mumbai, Mumbai City | Feb 16, 2024
भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडीची राज्याचा संयोजक म्हणून शुक्रवार, (ता.१६) फेब्रुवारी रोजी मुंबई बँकेच्या कार्यालयात आमदार प्रविण दरेकर यांनी ऑनलाईन बैठक घेतली. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा आणि माहिती बैठकीत जाणून घेतली. त्याचबरोबर आगामी कार्यक्रम, घर चलो अभियान, नमो चषक, नमो अँप आदी संदर्भात माहिती घेत सहकार आघाडीतील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.