जालना: पावसाळा तोंडावर; जालना महानगरपालिकेची नालेसफाई मोहीम कागदावरच?
Jalna, Jalna | May 11, 2026 जालना शहर महानगरपालिकेकडून पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये नाले तुंबलेल्या अवस्थेत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने २ मेपासून नालेसफाई मोहीम सुरू केल्याचे सांगितले असले तरी शहरातील अनेक मुख्य नाल्यांमध्ये अजूनही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने भोईपुरा नाला, पांगारकर नगर, यशवंत नगर, कन्हैय्या नगर, स्नेहल नगर आणि वाल्मी