तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या घाटकुळ येथे सन २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पीक नुकसान (पीकहानी) अनुदानाच्या वाटपात भीषण अनियमितता झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शासनाच्या आधार नोंदी, सातबारा उतारे आणि अनुदान वितरण यंत्रणेचा गैरवापर करून बनावट शेतकरी तयार करण्यात आले आणि त्यांच्या नावावर लाखोंचे अनुदान लाटण्यात आले, असा गंभीर आरोप दि. (२७) बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत वैभव पिंपळशेंडे व ग्रामस्थांनी केला आहे.