चंद्रपूर: नेहरू नगर येथे गोवर्धन पूजा उत्साहात साजरी; आ. किशोर जोरगेवार यांनी दिला समाज ऐक्याचा संदेश
गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देते. या परंपरेत आपल्या संस्कृतीचे मूळ दडले आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे आज दि 22 ऑक्टोबर 1 वाजता गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.