आ. आशुतोष काळे माझ्यावर लाडाची दादागिरी करतो आणि दादागिरी मी पण सहन करतो कारण त्याची हि दादागिरी हि लाडकी दादागिरी, आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी असतो त्यामुळे त्याची हि लाडकी दादागिरी मी यापुढेही सहन करीन अशी ग्वाही देवून आ. आशुतोष काळेंच्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी सांगितले. आज दिनांक २८ नोव्हेंबर सायंकाळी ५ वा.ते बोलत होते.