अमरावती: निराधारांना आधार देत माजी मंत्री प्रविण पोटे पाटील यांनी केली दिवाळी साजरी
निराधारांना आधार देत प्रविण पोटे पाटील यांची दिवाळी साजरी दिवाळीचा सण हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा असतो. या सणाचे खरे स्वरूप समाजातील दुर्लक्षित आणि निराधार घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी राज्यमंत्री मा. श्री. प्रविण पोटे पाटील, श्रेयसदादा पोटे पाटील व श्रुतीताई पोटे पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.