कोरेगाव येथील महार वतनाची १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी दाखवून पार्थ अजित पवार यांनी घेतल्याचा गंभीर आरोप सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी केला आहे. या व्यवहारात २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचाही दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना सूट न देणारे सरकार मात्र नेत्यांना मोकळं सोडत असल्याचा आरोप करत शिरसाट यांनी कोर्टीनिशी चौकशी व पार्थ पवारांवर ॲट्रॉसिटी आणि ४२० अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.