अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून वेतनाविना काम करत असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिलांच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी आयसीयू व इतर विभागात दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा दिली आहे. मात्र पगारासाठी विचारणा केली असता कंत्राटदार फोनसुद्धा उचलत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. वेतन न मिळाल्याने काम बंदचा इशाराही दिला आहे.