अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा समाजातील आर्थिक मागास कर्जदारांना देण्यात येणारा व्याज अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बनावट सही शिक्कांचा वापर करत खोटे कागदपत्रे सादर करून दोघांनी महामंडळाची आणि पर्यायाने शासनाची 674,700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत महामंडळाचे नगर जिल्हा समन्वयक शिवतेज सुरेश नळे यांनी फिर्याद दिली आहे