नागपूर ग्रामीण: : बुटीबोरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर शनिवारी, २० जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक तरुणाचे नाव आकाश वंजारी (वय २३, रा. प्रभाग क्रमांक २, बुटीबोरी) असे आहे. आकाश बुटीबोरी एमआयडीसीमधील एका कंपनीत 'क्वालिटी इन्स्पेक्टर' म्हणून कार्यरत होता. शनिवारी रात्रीची ड्युटी संपवून तो आपल्या दुचाकीने घरी परतत होता.