जळगाव: शिव कॉलनी येथे कायमस्वरूपी बस थांबा हवा! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नागरिकांची मागणी
एरंडोल-पाळसकडे जाणाऱ्या व येणाऱ्या महामंडळाच्या बसेससाठी शिव कॉलनी येथे कायमस्वरूपी बस थांबा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे 4 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता निवेदनातून केली आहे.