समुद्रपूर: शिरपूर शिवारात वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी:शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे वनविभाचे आव्हान
गिरड खुर्सापार परीसरात गेल्या ११ महिन्यापासून एक वाघीण तिचे तिन बच्चे आणि एक वाघ यांनी चांगलीच दहशत निर्माण केले असून या वाघांनी कोणत्याही मनुष्यावर हल्ला चढवला नसला तरी अनेक पाळीव जनावरांना यमदाणी पाठवले आहे. शिरपूर शिवारात दोन बकऱ्यांचा वाघाने फडश्या पाडल्यानंतर शेतकरी वासुदेव ढवळे यांच्या एका बैलावर वाघाने हल्ला चढविला यावेळी बैल सैरावैरा पळाल्याने थोडक्यात बचावला असल्या तरी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला:वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी खबरदारी बाळगण्याचे आव्हान केले आहे