कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक त्रास आणि त्यानंतर कामावरून काढून टाकल्याच्या तीव्र तणावातून महेश भास्करराव सावदेकर (वय ५२, रा. देविदास कॉलनी) यांनी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडकीस आली. महेश सावदेकर हे मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते.