वर्धा: डॉ. विजय बाबर मुरारका वाडी यांच्या घरी “किल्ले लोहगड”ची आकर्षक निर्मिती
Wardha, Wardha | Oct 25, 2025 दिवाळी निमित्त बाबर परिवाराने शिवसंस्कृतीची परंपरा जपत घरच्या अंगणात “किल्ले लोहगड”ची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून मुलांमध्ये शिवचरित्राची प्रेरणा निर्माण करणे हा उद्देश आहे. या निर्मितीत श्रीमयी बाबर, साक्षी मुंदडा, आराध्या मोहिते यांसह परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले असून किल्ल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी स्वामी समर्थ नगरी, मुरारका वाडी येथे भेट द्यावी, असे आवाहनही दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास के