कळमनूरी: जि.प.गट व प .स गण निवडणूक आरक्षण सोडतीबाबत 17 ऑक्टोबर पर्यंत हरकती सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
हिंगोली जि प , प स च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जि प क्षेत्रातील निवडणूक विभागाची व प स मधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या अनु जाती जमाती नामाप्र तसेच सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवण्यात आलेली निवडणूक विभाग व निर्वाचक गण बाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय,जि प हिंगोली, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय,पं स कार्यालयाच्या फलकावर लावण्यात आली आहेत .यावर दिनांक 17 ऑक्टो पर्यंत हरकती सूचना सादर करण्याचे कळविण्यात आले आहे .