भोईटे नगर येथील रेल्वेच्या मालधक्क्यावर गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता काम करीत असताना २८ वर्षीय तरुणाच्या छातीत अचानक दुखायला लागले. सोबतच्या सहकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. ऐन दिवाळीत घरातील तरुणाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.