नगपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.. अकोल्यातील हिवरखेड नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार सुलभा दुतोंडे यांच्या प्रचारार्थ यासह जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली असून 25 नोव्हेंबर राजी सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे.. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.. जिल्ह्यात नगरपालिका निवडणूकींच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे.