कर्जत: ठाकरेंच्या पक्षाची कर्जत विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक
Karjat, Raigad | Oct 29, 2025 रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोलंबे, तालुका संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर, तालुका संघटक बाबू घारे तसेच तालुका संघटीका करूना बडेकर यांच्या उपस्थितीत आज बुधवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास कर्जत विधानसभा मतदारसंघातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करत, येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रत्येक शिवसैनिकामागे खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासन दिले.