समुद्रपूर: करुळ शेत शिवारात वाघाचा मुक्त संचार:नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण:फटाके फोडून वाघाला हाकलण्याचे काम सुरू
समुद्रपुर तालुक्यातील करुळ शेत शिवरात वाघाचा मुक्त संचार सुरू असून शेत शिवारामध्ये वाघ फिरत असल्याने शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळी शेत शिवारामध्ये वाघाचे दर्शन झाले असून या वाघाला अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.या वाघाचा मुक्त संचार लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने फटाके फोडून वाघाला हाकलण्याचे काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे.या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.