समुद्रपूर: गिरड येथील विकास विद्यालयात राष्ट्रीय किसान दिन साजरा:मंडळ कृषी अधिकारी धनविजय यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शनात
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील विकास विद्यालयात राष्ट्रीय किसान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळ कृषी अधिकारी आर.पी.धनविजय प्रमुख पाहुणे म्हणून उपकृषी अधिकारी मनोज गायधने मुख्याध्यापक सोनकुसरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी धनविजय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शेती विषय मार्गदर्शन केले तर गायधने यांनी महाविस्तार एआय अँप विषयक माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवतळे तर आभार पूजा अग्निहोत्र यांनी मानले.