पलूस: सावकारीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या : सहा जणांविरोधात गुन्हा
Palus, Sangli | Sep 25, 2025 सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने पोलिसांना मेल पाठवून आपल्या यातना व्यक्त केल्या आणि त्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. घोगाव (ता. पलूस) येथील महेश मोहन चव्हाण (४४) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूपूर्वीच्या मेलमुळे सावकारीचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या मेलच्या आधारे सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.