जालना: जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर “मिनी मोका” लागू..
Jalna, Jalna | Apr 19, 2026 जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई! अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर “मिनी मोका” लागू.. आज दिनांक 19 रविवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर “मिनी मोका” अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर धंद्यांवर मोठा आळा बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र राज्यात गुटखा उत्पादन, वाहतूक व विक्रीस बंदी अ