अलिबाग: अंबा नदीतील रिलायन्सच्या प्रदूषणामुळे मच्छीमार संकटात, शिवसेना ठाकरे गट आक्रमक, फौजदारी कारवाईची मागणी
Alibag, Raigad | Nov 7, 2025 रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.